परमबीर सिंह-सचिन वाझे गुप्त भेटीप्रकरणी नवी मुंबई पोलिसांतील चार जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगासमोर उपस्थित झाले होते. तेव्हा परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची एका घंट्यासाठी भेट झाली होती, असे समोर आले आहे…

तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा ! – उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे

तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी.

नवी मुंबईत ६० लाख रुपये किमतीचा गुटखा कह्यात, ७ जणांना अटक

राज्यात गुटखाबंदी असतांना गुटखा पकडण्यासाठी मोहीम का राबवावी लागते ? पोलीस त्यापूर्वीच अशा कारवाया का करत नाहीत ?

मुंबईतून कोरोना जाण्यास प्रारंभ !

शहरातील कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट ओसरायला लागली असून दैनंदिन रुग्णसंख्या ६ सहस्रांपर्यंत खाली आली आहे. मुंबईत कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बर्‍यापैकी ओसरलेली असेल.

बालहत्याकांडातील आरोपी सीमा गावीत आणि रेणुका शिंदे या बहिणींची फाशीची शिक्षा विलंबाच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाकडून रहित !

सर्व प्रकारच्या यंत्रणांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यावरही फाशी न देऊ शकणारी शासकीय व्यवस्था गुन्हेगारांवर वचक कसा निर्माण करणार ?

पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या पटोले यांना अटक करा ! – केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश, भाजप

१८ जानेवारी या दिवशी भाजप  प्रदेश कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. भंडारा येथे काही नागरिकांशी संवाद साधतांना पटोले यांनी ‘मी मोदी यांना शिव्या देऊ शकतो. मारू शकतो’, असे वक्तव्य केले होते.

मुंबईतील विवाह नोंदणी सेवा तात्पुरती स्थगित !

वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणार्‍या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने १८ जानेवारी या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या मुंबईतील शीवगडाची दुरवस्था !

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे. आणखी दुर्लक्ष झाल्यास यावरील बांधकाम नामशेष होण्याची..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे पावित्र्य राखण्यासाठी भाजपकडून दक्षता समिती स्थापन !

गड-दुर्गांकडे सर्व द्रुष्टीने दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभागातील अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !