आमदार निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ ! – अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘दळणवळण बंदी’त शिथिलता आणल्यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याची ३३ टक्के महसुलात वाढ झाली आहे, तसेच ‘जी.एस्.टी.’च्या परताव्यात ही वाढ झाली आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीस राज्यपालांनी अनुमती नाकारली !

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात पालट करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी दिनांक निश्चित करता येत नाही, अशी भूमिका कोश्यारी यांनी घेतली आहे. राज्यपालांनी दिनांक निश्चित केल्याविना निवडणूक होऊ शकत नाही.

मनसेने आय.पी.एल्.ची बस फोडली !

आय. पी. एल. साठी महाराष्ट्रातील व्यावसायिकांना काम न देता बस देहलीतुन बस मागवल्या आहेत. याविषयी आय.पी.एल्. व्यवस्थापन आणि सरकार यांना विनंती करूनही काही पालट झाला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलले.

राज्यातील ५ राष्ट्रीयीकृत बँकांतील १२ प्रकरणांत १३ सहस्र २५७ कोटी रुपयांचा अपव्यहार आणि फसवणूक !

अर्थसंकल्पावरील अनुदान मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, वरील बँकेतील पैसा हा सामान्य माणसाचा असून त्याचा अपहार झाला आहे.

मुंबईतील १४ सहस्र स्वच्छता कामगारांना येत्या २ वर्षांत प्रत्येकी ३९९ चौ.मी. घर देणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये एकूण २९ सहस्र ८१६ स्वच्छता कामगार आहेत. त्यांपैकी ५ सहस्र ५९२ कामगारांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे १० वर्षांचे दायित्व ठेकेदाराचे असणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले काळे पालट मागे घेण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाचे राज्यपालांना १ लाख विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन सुपूर्द !

महाराष्ट्र सरकारने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे पालट करत विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला.

७ वर्षांत कल्याण-डोंबिवली येथील ११ सहस्र ४४२ अनधिकृत बांधकामांवर कारवाई ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होईपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही ? याविषयी संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची कार्यवाही न केल्यास शाळांवर कारवाई करणार ! – डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री

केंद्रशासनाच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) २००३ ची राज्यभर कार्यवाही करण्यात येत आहे.

होळी आणि धूलिवंदन यांसाठी शासनाकडून नियमावली घोषित !

होळी साजरी करतांना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होणार !

बावनकुळे यांच्या काळात महावितरणने हाती घेतलेल्या कामांची खरंच आवश्यकता होती का ? त्या कामांचा लोकांना लाभ झाला का ?, हे शोधण्याचे काम चौकशी समिती करेल.