मुंबई – राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचनेत काहीही चुकीचे नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अधिवक्ता असीम सरोदे यांनी बहुउद्देशीय प्रभाग रचनेच्या विरोधात ही याचिका केली होती. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू होणार आहे. मुंबईमध्ये प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक, तर राज्यातील उर्वरित महानगरपालिका आणि नगरपालिका यांमध्ये मात्र एका प्रभागात ३ नगरसेवक असणार आहेत.