आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोधेला जाणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे

मुंबई – पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे १० जून या दिवशी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे खासदारही असतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जून या दिवशी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.