मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ !
मुंबई – मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आता खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. या नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना प्रतिदिन समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. गोरेगाव (पूर्व) येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने ‘सर्वांसाठी पाणी’ हे नवे धोरण घोषित केले आहे.