भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची बांगलादेश सरकारला विनंती !
नवी देहली – बांगलादेशामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात ३५ पूजा मंडपांवर झालेली आक्रमणे, पेट्रोल बाँब फेकणे, तसेच काली मंदिरात झालेली मुकुट चोरी यांची गंभीर नोंद घेत भारताच्या परराष्ट्र विभागाने बांगलादेशातील हिंदू, सर्व अल्पसंख्यांक आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांची सुरक्षा यांची काळजी घ्यावी, अशी विनंती बांगलादेशाच्या अंतरिम सरकारकडे केली आहे.
Ensure the safety of Hindus and their places of worship. – Statement of India’s Ministry of External Affairs to Bangladesh’s Government
👉 It is demoralizing that a nuclear-armed nation like #India has to make such a request
👉 India should have issued a warning and a deadline… pic.twitter.com/PasV39Q3wx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 13, 2024
१. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर झालेली आक्रमणे खेदजनक आहेत. बांगलादेशातील मंदिरे आणि श्रद्धास्थाने यांचा पद्धतशीर पावित्र्यभंग केला जात आहे. ढाक्याच्या तांतीबाजार येथील दुर्गापूजा मंडपावरील आक्रमण आणि सातखीरा येथील जोशेरोश्वरी काली मंदिरातील चोरी, यांची आम्ही गांभीर्याने नोंद घेतली आहेे.
२. पूजा मंडपांवर होणार्या आक्रमणांच्या घटनांमुळे चिंता आणि भीती आहे, अन्यथा हा सोहळा अधिक उत्साहात साजरा झाला असता, असे तेथील हिंदू नागरिकांनी सांगितले.
Our statement on attack on Puja Mandap and desecration and damage to Hindu temples in Bangladesh:https://t.co/KXGnXLhgjq pic.twitter.com/Ty746nPn5c
— Randhir Jaiswal (@MEAIndia) October 12, 2024
अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस यांची ढाकेश्वरी मंदिराला भेट !
बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी ढाक्यातील अनेक शतके जुन्या ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली. ‘आम्हाला असा बांगलादेश उभारायचा आहे, जिथे प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे रक्षण केले जाईल’, असे ते मंदिरातील कार्यक्रमात म्हणाले. (केवळ तोंडाच्या वाफा दवडणारे महंमद युनूस ! जर प्रत्येक नागरिकाचे रक्षण करायचे असते, तर तसे प्रत्यक्षात दिसूनही आले असते ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|