राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मेधा कुलकर्णी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन !

प्रा. सौ. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याविषयी २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी म्हणजे कोथरूड येथील सात्यकी बंगल्यावर भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Australia Indian Origin Senator : ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भारतीय वंशाचे पहिले खासदार बनले वरुण घोष !

भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. घोष हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले भारतीय वंशाचे खासदार बनले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

भारताला तोडण्याच्या गोष्टी कुणी करू नयेत ! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्‍वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !

Repeal Worship Act : ‘धार्मिक पूजा स्थळ कायदा १९९१’ रहित करा ! – भाजपच्या खासदाराची राज्यसभेत मागणी

केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन हा कायदा रहित करावा आणि धर्मांधांच्या कह्यात असलेली हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !

MP Chandra Arya Canada : जगभरातील १२० कोटी हिंदूंसाठी नव्या युगाचा प्रारंभ ! – खासदार चंद्रा आर्य, कॅनडा

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकांच्या बलीदानानंतर अयोध्येतील दिव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा खरोखरच एक भावनिक क्षण होता – भारतीय वंशाचे कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य

Brawl In Maldives Parliament : मालदीव येथील संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हाणामारी !

मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात प्रचंड हाणामारी आणि गदारोळ झाला. राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या मंत्रीमंडळाला संसदेत मंजुरी मिळणार होती.

‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’, याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता निवडणुकीत घेईल ! – भाजपचे खासदार प्रताप सिंहा

‘मी देशद्रोही आहे कि देशभक्त ?’ याचा निर्णय माझ्या मतदारसंघातील जनता वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेईल’, असे विधान कर्नाटकातील म्हैसुरू येथील भाजपचे खासदार प्रताप सिंहा यांनी केले आहे.

अमेरिकेतील हिंदु मंदिरावरील आक्रमणाचा भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध !

कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या तोडफोडीचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या खासदारांनी निषेध केला आहे.

अमेरिकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तेथील खासदारांनी बनवला ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ गट

भारतातील हिंदु खासदारांनी देशातील हिंदूंसाठी कधी असा प्रयत्न केला आहे का ?

MP Suspended : आतापर्यंत विरोधी पक्षांचे १४१ खासदार निलंबित !

जगात भारतीय लोकशाहीची थट्टा करणारे हे आणखी एक उदाहरण !  संरक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असतांना त्यावर राजकारण करणे हे विरोधी पक्षांच्या खासदारांना लज्जास्पद !