MP Chandra Arya Canada : जगभरातील १२० कोटी हिंदूंसाठी नव्या युगाचा प्रारंभ ! – खासदार चंद्रा आर्य, कॅनडा

कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांची श्री रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी प्रतिक्रिया

ओटावा – २२ जानेवारीला अयोध्येत झालेल्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा  सोहळ्याविषयी जगभरातून अजूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय वंशाचे कॅनेडियन खासदार चंद्रा आर्य यांनी या सोहळ्याचे कौतुक केले आणि ‘जगभरातील १२० कोटी हिंदूंसाठी हा नव्या युगाचा प्रारंभ आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य यांनी श्रीराममंदिराविषयी सांगितले की, त्यांनी ओटावा येथून श्रीराममंदिरातील सोहळ्याचा भावनिक क्षण थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला. २२ जानेवारी २०२४ या दिवशी जगातील सर्वांत प्राचीन धर्माच्या इतिहासात एक नवीन युग चालू झाले.

श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा हा एक भावनिक क्षण ! – चंद्रा आर्य

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि लोकांच्या बलीदानानंतर अयोध्येतील दिव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा खरोखरच एक भावनिक क्षण होता.

जागतिक नेता बनण्यासाठी भारताकडून सभ्यतेची पुनर्बांधणी ! – चंद्रा आर्य

भारत आणि कॅनडा हे एकमेकांचे भागीदार असल्याचे वर्णन करतांना खासदार चंद्रा आर्य म्हणाले की, जागतिक आर्थिक शक्ती बनण्यासाठी भारत त्याच्या सभ्यतेची पुनर्बांधणी करत आहे. आर्थिक संधी सामायिक करण्यासाठी आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत अन् कॅनडा नैसर्गिक भागीदार आहेत.