वॉशिंग्टन (अमेरिका) – धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेतील खासदारांनी ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ या गटाची स्थापना केली. रिपब्लिकन पक्षाचे खासदार पीटर आणि एलिस स्टेफानिम यांनी अमेरिकेच्या संसदेत ही घोषणा केली. या गटात हिंदूंच्या संदर्भात सहानुभूती असणारे खासदार असणार आहेत.
१. या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ची स्थापना आमच्या देशाच्या राजधानीमध्ये होणे, हे हिंदु-अमेरिकी समाजाचा आवाज ओळखून तो वाढवण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही हिंदूंच्या चिंता मांडून त्यांचे अमेरिकेतील योगदान समोर आणण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्यांचे म्हणणे आम्ही नेहमीच प्राधान्याने ऐकू. काँग्रेशनल हिंदु कॉकसचा उद्देश्य हिंदु-अमेरिकी समाजाच्या मूल्यांना प्राधान्य देेणे, हा आहे.
२. काँग्रेशनल हिंदु कॉकस भारत, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, बांगलादेश, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, युनायटेड किंगडम्, नेदरलँड्स आदी अनेक देशांतील हिंदूंचे प्रतिनिधित्व करतो. यात हिंदूंसह शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांचाही समावेश आहे.
३. खासदारांच्या म्हणण्यानुसार ‘काँग्रेशनल हिंदु कॉकस’ मुक्त व्यापार, सीमित सरकार, आर्थिक शिस्त, भक्कम कौटुंबिक मूल्ये आणि सत्तावादी शासनाच्या विरोधात एक सशक्त धोरणाचे प्रतिनिधित्व करतो. हे केवळ अमेरिकेपुरते मर्यादित नाही, तर अनेक देशांसाठी आहे.
US: अमेरिकी संसद में अब हिंदुओं के हितों की रक्षा के लिए साथ आए सांसद, समूह बनाने का एलान, जानें क्या बोले#US #HinduCaucus #USCongresshttps://t.co/nXN5Pq3HQs
— Amar Ujala (@AmarUjalaNews) December 20, 2023
संपादकीय भूमिकाभारतातील हिंदु खासदारांनी देशातील हिंदूंसाठी कधी असा प्रयत्न केला आहे का ? |