मराठा आरक्षणाप्रकरणी केंद्राची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे’, हा ५ सदस्यीय घटनापिठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ जुलै या दिवशी पुन्हा अधोरेखित केला.

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन समर्पित केले आहे.

बिहारमध्ये चिराग पासवान यांच्याविरुद्ध लोकजनशक्ती पक्षाच्या पाचही खासदारांचे बंड !

भारतीय राजकारणातील तत्त्वहीनता ! पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे लोकप्रतिनिधी कधी जनतेशी एकनिष्ठ रहातील का ?

मुंबई उच्च न्यायालयाकडून खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रहित !

उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे.

फेरीवाल्यांना पूर्वी घोषित केलेले आणि अद्याप न मिळालेले आर्थिक साहाय्य तात्काळ द्यावे !

गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती.

लोकसभेमध्ये केवळ १५ खासदारांचीच उपस्थिती १०० टक्के

आता संसदेत उपस्थित रहाण्यावरूनच या लोकप्रतिनिधींना वेतन आणि अन्य भत्ते दिले पाहिजेत. विनाकारण अनुपस्थित रहणार्‍यांकडून दंडही वसूल केला पाहिजे !

भाजपचे खासदार शर्मा यांची देहलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राम स्वरूप शर्मा हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी होते.

थकीत वीजदेयके टप्प्याटप्प्याने भरण्यास सवलत द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ ! – उदयनराजे भोसले

थकबाकीमुळे वीजजोडणी तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अशा वेळी आम्ही ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभे राहू,असेही ते पुढे म्हणाले

(म्हणे) ‘उत्तरप्रदेशात भाजप सत्तेत आल्यापासून पोलीस चकमकीत मारले गेलेल्यांपैकी ३७ टक्के मुसलमान !’  

जर ओवैसी यांनी दिलेली आकडेवारी खरी असेल, तर इतक्या मोठ्या संख्येने मुसलमान गुन्हेगारी कृत्यात सहभागी होते, हेच सिद्ध होते; कारण आतापर्यंत या चकमकीवरून पोलिसांवर कुणीही आक्षेप घेतलेला नाही कि गुन्हा नोंदवण्यात आल्याचे ऐकिवात नाही.