कफ सिरप बनवणार्‍या १७ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस !

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरपमधील हानीकारक घटकद्रव्यांमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिली.

तुटक्या एस्.टी.वर विज्ञापन दिल्याप्रकरणी निलंबित केलेल्या ‘एस्.टी’च्या कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते

राज्यशासनाने विज्ञापनांऐवजी ‘एस्.टी’च्या दुरुस्ती, देखभाल आणि कर्मचारी यांच्या हितासाठी पैसा वापरावा !

वारीशे यांच्या घातपाताविषयी सखोल चौकशी करण्याविषयी आमदार डॉ. राजन साळवी यांनी मांडली लक्षवेधी सूचना

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लोकशाही मार्गाने मांडलेल्या भूमिके संदर्भात पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या गुन्हेगारांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.

ओणी अणुस्कुरा रस्त्याच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद ! – सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण

‘रस्ता तातडीने होणे आवश्यक होते; परंतु निधीअभावी या रस्त्याचे काम रखडले होते. येणार्‍या अर्थसंकल्पामध्ये या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’

सोलापूर येथे पैलवानांकडून मोठ्या प्रमाणात उत्तेजक द्रव्यांचा वापर !

सोलापूर येथे आखाड्यांतील पैलवान उत्तेजनासाठी ‘मेफेन्टरमाईन सल्फेट’ या ‘इंजेक्शन’चा मोठ्या प्रमाणात अवैधपणे वापर करत असल्याची धक्कादायक माहिती अन्न आणि औषध विभागाकडून विधानसभेत देण्यात आली.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना शासन साहाय्य करेल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नाफेडच्या माध्यमातून ३ आस्थापनांकडून कांद्यांची खरेदी चालू असून आतापर्यंत १८ सहस्र ७४३ क्विंटल कांदा खरेदी केला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना शासन साहाय्य करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी सभागृहात केले.

तेलशुद्धीकरण प्रकल्‍पाच्‍या नियोजित ठिकाणी आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्‍याकडून भूमीची खरेदी ! 

सरकारकडून अधिक पटीने पैसा मिळावा, यासाठी अनिलकुमार गायकवाड या सरकारी अधिकार्‍याची तेलशुद्धीकरण प्रकल्‍पाच्‍या नियोजित ठिकाणी सहस्रो एकर भूमी आहे.

खासदार संजय राऊत यांच्या हक्कभंगावरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हटल्याविषयी भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात विधानसभेत केलेल्या हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारला आहे. याविषयी २ दिवसांत चौकशी सभागृहात निर्णय देऊ, अशी घोषणा अध्यक्षांनी केली.

संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रविष्ट करण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांचा गदारोळ !

संजय राऊत सत्ताधार्‍यांविषयी म्हणाले, ही बनावट शिवसेना आहे. डुप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नव्हे, हे चोरमंडळ आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या मागणीवरून विधानसभेचे कामकाज ३ वेळा तहकूब !

खासदार संजय राऊत यांनी ‘विधीमंडळ चोरमंडळ आहे’, या केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.