१२ वीच्‍या उत्तरपत्रिका वेळेत पडताळून होण्‍यासाठी सर्व उपाययोजना काढू ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी १२ वीच्‍या ५० लाख उत्तरपत्रिका पडताळल्‍याविना पडून असल्‍याचे सूत्र सभागृहात उपस्‍थित केले. हा विषय माहितीच्‍या सूत्राच्‍या अनुषंगाने सभागृहात उपस्‍थित केला. त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.

देशातील सर्वाधिक कुष्‍ठरोगी महाराष्‍ट्रात !

कुष्‍ठरोगींना अपंगत्‍वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्‍यांना नोकर्‍या उपलब्‍ध करून देणे, यांविषयी सर्वंकष धोरण निश्‍चित करण्‍यासाठी संबंधित तज्ञ अन् अधिकारी यांची समिती नेमण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि नोकर्‍या देण्याविषयी शासन समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणे आणि त्यांना नोकर्‍या उपलब्ध करून देणे याविषयी सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी संबंधित तज्ञ आणि अधिकारी यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत केली.

कांदा प्रश्नावरून विरोधकाचा गदारोळ; विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

राज्यात कांदा आणि कापूस यांचे भाव गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. विधान परिषदेत कांदाप्रश्नी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. सरकारने कांदा खरेदी करून शेतकर्‍यांना योग्य भाव द्यावा, अशी मागणी विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत उचलून धरली

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूची १६ जणांच्या विशेष तपास यंत्रणेद्वारे चौकशी चालू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आरोपींचे भ्रमणभाष कह्यात घेण्यात आले असून त्यांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्यात आले आहे. ‘यातून पूर्वीची काही माहिती मिळते का ?’ हे पहाण्यात येत आहे.

राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी मलनि:स्सारण प्रक्रिया चालू करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाल्याचे पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी बांधकाम, तसेच अन्य उद्योगांसाठी करावे, असा आदेश औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आला आहे. पाण्याचा पुनर्वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भविष्यात नद्यांचे प्रदूषण अल्प होईल.’

भिडेवाड्याला संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यासाठी न्यायालयात मागणी करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या वेळी उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी भिडेवाडा येथे स्मारक करण्याविषयी तेथील जागेचे मालक, विकासक आणि भाडेकरू यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे. न्यायालयीन दाव्यांमुळे या जागेचे भूसंपादन प्रलंबित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालून विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

कांदा, लसूण, कापूस यांना भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. गळ्यात कांदा-लसूण यांच्या माळा घालत विरोधकांनी सरकारचा धिक्कार केला.

समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे मराठीत द्यावीत ! – आमदार अजय चौधरी

मराठी भाषाभवनाचे भूमीपूजन होऊनही अद्याप कामाला प्रारंभ झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील ठिकाणांची नावे हिंदी आणि इंग्रजी यांमध्ये आहेत.