छायाचित्रांच्या ‘मॉर्फिंग’ प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील शासकीय कार्यालयात काम करणार्‍या महिलांची ‘मॉर्फिंग’ (चेहर्‍याचे विद्रूपीकरण करून सामाजिक माध्यमांवर चित्र प्रसारित करणे) केलेली छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात येईल, तर पोलीस निरीक्षकाचे स्थानांतर करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सांगितले. … Read more

राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविषयी राज्यशासन गंभीर आहे. राज्यशासन लव्ह जिहादविरोधी कायदा करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.

आदिवासी समाजाच्या विविध मूलभूत प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार ! – सुरेश खाडे, कामगारमंत्री

आदिवासी-कातकरी समाजातील वेठबिगारीचा प्रश्न आणि त्यात मुलीचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याविषयी गुन्हे नोंद करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. शासनाच्या वतीने पुनर्वसन करण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शाळा-महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही लावण्याविषयी २ सचिवांची समिती स्थापन करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याविषयी सक्ती करण्याची सूचना केली जाईल. शक्य असल्यास साहाय्य दिले जाईल, तसेच अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाविषयी ‘गुड टच, बॅड टच’चे पोलीस दीदींकडून धडे देण्यात येत आहेत.

जुनी निवृत्ती वेतन योजना चालू करणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जुनी निवृत्ती वेतन योजना शासन चालू करणार नाही; कारण हे वेतन दिल्यास राज्यावर १ लाख १० सहस्र कोटी रुपयांचा बोजा पडून राज्य दिवाळखोरीत निघेल.

छगन भुजबळ यांच्याकडून मुंबईचा ‘कोंबडी’ असा उल्लेख !

छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई ही सोन्याची अंडे देणारी ‘कोंबडी’ आहे. ती कापून खायची का ? त्यावर भाजपच्या सदस्या मनीषा चौधरी यांनी जोरदार आक्षेप घेत हरकतीचे सूत्र उपस्थित केले.

मुंबईतील सर्व पुलांचे करण्यात येणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ !

मुंबईतील ‘धोकादायक’ म्हणून घोषित करण्यात आलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ‘गोपाळ कृष्ण गोखले पूल’ पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी अशी घोषणा केली.

मेंढपाळांवर खोटे गुन्हे नोंद करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी गावात काही जमीन क्षेत्र राखीव ठेवावे आणि प्रायोगिक तत्त्वावर चराई वनभूमी मेंढपाळांना उपलब्ध करून द्यावी, तसेच पशुविमा संरक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

राजकीय नेत्यांनी सामाजिक माध्यमांवर छायाचित्र पाठवतांना संहिता पाळावी ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करू नयेत. त्यांनी सामाजिक माध्यमांवर संहिता पाळावी.

अधिष्ठाता आणि संबंधित आधुनिक वैद्य यांची विभागीय चौकशी करणार ! – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई, पुणे, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांतील सर्व शासकीय रुग्णालयांत येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना व्हेंटिलेटर देणे अशक्य असते. तरीही ते देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.