मुंबईतील सर्व पुलांचे करण्यात येणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ !

मुंबईतील पुलांचे करण्यात येणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

मुंबई – समयमर्यादा निश्चित करून मुंबईतील सर्व पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या वतीने केली. मुंबईतील ‘धोकादायक’ म्हणून घोषित करण्यात आलेला अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ‘गोपाळ कृष्ण गोखले पूल’ पुनर्बांधणीसाठी ७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी बंद करण्यात आला आहे. हा पूल बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याप्रकरणी भाजपचे आमदार सुनील राणे यांनी पुलाचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली.

मंत्री उदय सामंत

हा पूल धोकादायक असल्याच्या, तसेच कामाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली.