विधानसभेतून…
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचे ‘मॉर्फ’ केलेले छायाचित्र स्वतःच्या सामाजिक माध्यमातील हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री जयंत पाटील यांनी २१ डिसेंबर या दिवशी याकडे विधानसभेत सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार अतुल भातखळकर यांनी माजी मंत्री छगन भुजबळ साहेबांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सभागृहाचे लक्ष वेधले. #हिवाळीअधिवेशन2022 #नागपूर_अधिवेशन #महाराष्ट्र @ChhaganCBhujbal @NCPspeaks pic.twitter.com/OFQFt8cAPk
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 21, 2022
सभागृहातील सदस्यच दुसर्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचे छायाचित्र मॉर्फ करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून ट्रोल करत असेल, तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार ? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करू नयेत. त्यांनी सामाजिक माध्यमांवर संहिता पाळावी.