Tamil Nadu CM’s Statement : मी प्रतिज्ञा करतो की, हिंदी लादण्यास विरोध करीन !

वाढदिवसानिमित्त स्टॅलिन यांची घोषणा

तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – मी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रतिज्ञा करतो की, मी हिंदी भाषा लादण्यास विरोध करीन, अशी घोषणा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी १ मार्च या दिवशी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या दिवशी केली. देशातील त्रिभाषा धोरणाचा विरोध म्हणून त्यांनी ही घोषणा केली.

स्टॅलिन म्हणाले की, केंद्र सरकार प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली त्रिभाषा धोरण राबवत आहे. खरेतर हे धोरण म्हणजे बिगर हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी लादण्याचे षड्यंंत्र आहे. पंजाब आणि तेलंगाणा यांनी राज्यभाषा अनिवार्य केल्याने त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही राज्यांनी केंद्रातील भाजप सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे, ज्यांतर्गत केंद्र सरकार दावा करत आहे की, नवीन शिक्षण धोरणांतर्गत त्रिभाषा धोरण हे ‘प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे’ आणि ‘त्यांचा प्रसार करणे’ यांसाठी लागू केले जात आहे.

संपादकीय भूमिका

राजकारणाच्या नावाखाली भाषेच्या आधारे देशात फुटीरतेची बिजे पेरणारे एका राज्याचे मुख्यमंत्री असणे, हे देशाच्या लोकशाहीला कलंकच म्हटले पाहिजे. राष्ट्रहितार्थ केंद्र सरकारने अशांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !