छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्‍युलर’ दाखवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, वक्‍फ बोर्डाला दिलेली अमर्याद सवलत, हलाल जिहाद अशा समस्‍या संपवण्‍यासाठी पुन्‍हा हिंदु राष्‍ट्रच आवश्‍यक असून त्‍यासाठी सर्वांनी वेळ देणे आवश्‍यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि परिवाराचा घोटाळा ५०० कोटी रुपयांहून अधिक ! – किरीट सोमय्‍या

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्‍या घोटाळ्‍याची माहिती घेण्‍यासाठी किरीट सोमय्‍या हे कोल्‍हापूर येथे आले होते. तेव्‍हा त्‍यांनी प्रसिद्धी माध्‍यमांशी संवाद साधला.

पंचमहाभूत लोकोत्‍सवातून युवा आणि बाल वर्गात निर्माण झालेली जाणीव सातत्‍याने विकसित करावी ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री, गोवा

डॉ. सावंत पुढे म्‍हणाले, ‘‘गोवा राज्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’ या संकल्‍पनेनुसार ‘आत्‍मनिर्भर भारत-स्‍वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला गती येण्‍यासाठी या पंचमहाभूत लोकोत्‍सवाचा मोठाच लाभ होणार आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या एका नामफलकाची दुरवस्‍था, तर दुसरा फलकच गायब !

कोल्‍हापूर शहरात सरस्‍वती चित्रमंदिराशेजारी असलेल्‍या स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या नामफलकाची दुरवस्‍था झाली आहे, तसेच हा फलक अतिक्रमणाच्‍या गर्तेत सापडला आहे.

‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’च्‍या वतीने पंचमहाभूत लोकोत्‍सवासाठी १०० किलो तूरडाळ !

‘आयुर्वेदिक रिटेलर्स असोसिएशन’ (ए.आर्.ए. महाराष्‍ट्र) शाखा कोल्‍हापूर यांच्‍या वतीने पंचमहाभूत लोकोत्‍सवासाठी १०० किलो तूरडाळ अर्पण देण्‍यात आली.

अध्यात्म-ज्ञान यांचा संगम साधल्यास जीवन परिपूर्ण करण्यास साहाय्य होईल ! – पद्मश्री डॉ. हिमतसिंह बावस्कर

आरोग्य विषयक संपन्नता ही बाजारात कुठेही विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. त्यामुळे आरोग्य हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगात मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी घेतली पंचतत्त्वांच्या संरक्षणाची शपथ !

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी सिद्ध केलेल्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. केवळ २० मिनिटांत ५० कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !

या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.

कोल्हापूर येथे निघालेल्या शोभायात्रेत पर्यावरण रक्षणासह इतिहास, भारतीय संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद यांचा जागर !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला गांधी मैदान ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.