शिवसेनेच्या वतीने राज्याभिषेक सोहळा उत्साहात : मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके !

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्याभिषेकदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम !

हिंदु धर्मामध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व असून पंचगंगा नदीचे माहात्म्य अगदी पुराणांमध्येसुद्धा गौरवलेले आहे.

१० जूनला पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक !

पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १० जून या दिवशी विभागीय लोकशाहीदिन झाल्यावर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वर्चस्व !

ज्या लढतीकडे राज्याचेच नाही, तर देशाचे लक्ष होते, ती लढत म्हणजे बारामती येथील अजित पवार यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्यात झाली.

‘प्रिन्स शिवाजी’मध्ये अभियांत्रिकीचा पदवी अभ्यासक्रम चालू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून मान्यता !

नवीन अभ्यासक्रमात ‘मेकॅनिकल ॲन्ड मेकॅट्रॉनिक्स’, ‘इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड पॉवर’, ‘कम्प्युटर सायन्स’, ‘कम्प्युटर सायन्स (ए.आय.एम्.एल्.) हे उदयोन्मुख कल असलेले पदवी अभ्यासक्रम उपलब्ध असतील.

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त ‘कोल्हापूर हायकर्स’ची ‘पवित्र जल संकलन’ मोहीम ! – सागर पाटील

सह्याद्री पर्वतरांगा आणि हिमालयातून ट्रेकिंग करून प्रत्येक वर्षी ‘कोल्हापूर हायकर्स’चे मावळे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हे जल आणतात. विविध ठिकाणांहून आणलेले हे पवित्र जल एकत्रित करून ५ जूनला रायगडावर पोचवणार आहोत.

गांधीनगर भागातील ओढे, नाले, गटारी पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करा ! – राजू यादव

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनास प्रत्येक पावसाळ्याच्या पूर्वी निवेदन का द्यावे लागते ? जनतेच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काम काय करतात ?

महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागाची पंचगंगा नदीच्या घाटावर अग्नीशमन, शोध आणि बचाव यांची प्रात्यक्षिके !

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली.

आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी येथे नगर परिषदेत प्रशांत तराळ आणि पोलीस ठाण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राज्यभरात उसळली संतापाची लाट, भाजपचे आंदोलन, तर राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी !

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण !