कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

अभिनेते शरद पोंक्षे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक भेट दिले.

कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दसरा चौक येथे निषेध !

आमदार आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे देशभरातील ८ कोटी वीरशैव लिंगायत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

वर्षभर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी लढा देण्याचा निर्धार !

२० ऑक्टोबरला पंचगंगा नदीच्या काठावर ‘जागर पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा’ या मोहिमेचा प्रारंभ केला. या प्रसंगी प्रतिज्ञा करून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी वर्षभर सातत्याने आणि संघटितपणे लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमीला सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

हिंदु एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार नितीन शिंदे यांची निवड !

कोल्हापूर येथे हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयामध्ये झालेल्या प्रदेशाच्या बैठकीमध्ये हिंदु एकता आंदोलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा !

त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी आणि शृंगारवेषांनी युक्त, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी अशी मोहिनी रूपाचे दर्शन घडवणारी ही महापूजा होय. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.

श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा !

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची पंचमीला गजारूढ रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

नवरात्रीच्या निमित्ताने ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेस प्रारंभ !

नवरात्रीच्या निमित्ताने कोल्हापूर महापालिकेच्या परिवहनच्या अर्थात् ‘के.एम्.टी.’च्या ‘श्री दुर्गादर्शन’ विशेष बससेवेस १५ ऑक्टोबरला परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

ऐन नवरात्रोत्सवात सांडपाणी आणि अन्य दूषित पाणी पंचगंगेत 

कोल्हापूर शहरासाठी ज्यातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्या पंचगंगेत ऐन नवरात्रोत्सवात शहरातील विविध नाल्यांमधील पाणी थेट नदीत मिसळत आहे. या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ या सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई आणि त्यांचे सहकारी यांनी पहाणी करून हा प्रकार उघडकीस आणला.