
कोल्हापूर – राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राज्याभिषेकदिनाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांच्या थरारांनी राज्याभिषेक सोहळ्यात रंगत आणली.
या प्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ. मंगल साळोखे, शहाजी तरुण मंडळाचे उदय शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
परदेशी वृत्तमाध्यमांचा हिंदुद्वेष आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचे सामर्थ्य !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !