कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या वतीने पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम !

पंचगंगा नदीच्या घाटाची स्वच्छता करतांना ब्राह्मण पुरोहित संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते

कोल्हापूर – कोल्हापूरची जीवनदायी असणार्‍या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हिंदु धर्मामध्ये नदीला अनन्यसाधारण महत्त्व असून पंचगंगा नदीचे माहात्म्य अगदी पुराणांमध्येसुद्धा गौरवलेले आहे. त्यामुळे पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात नदीकाठी असणारे प्लास्टिक, तसेच अन्य कचरा गोळा करून घाटाची स्वच्छता करण्यात आली. या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष सचिन पितांबरे, धार्मिक प्रमुख मंदार जोशी, संचालक आणि सभासद उपस्थित होते. या कार्याला प्रशासनाच्या वतीने सहकार्य करण्यात आले.