कोल्हापूर – पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १० जून या दिवशी विभागीय लोकशाहीदिन झाल्यावर सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक प्रत्येक ३ महिन्यांतून एकदा आयोजित केली जाते. ३ महिन्यांत आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या उपाययोजना यांविषयी पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते, अशी माहिती पुणे महसूल विभागाच्या प्रभारी उपआयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल यांनी दिली आहे. (भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बैठका प्रशासन आयोजित करते, भ्रष्टाचार न करण्याच्या शपथा दिल्या जातात; मात्र प्रत्यक्षात कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला कोणत्या ना कोणत्या विभागातील अधिकारी-कर्मचारी लाच घेतांना सापडतात. त्यामुळे नुसत्या बैठका घेण्यापेक्षा भ्रष्टाचार न होण्यासाठी ठोस उपाययोजना शोधल्या पाहिजेत; अन्यथा अशा बैठका म्हणजे केवळ कागदी घोडे नाचवणे, असे होईल ! – संपादक)