जीवन संजीवनी प्रशिक्षणाने जीव वाचवणे शक्य ! – डॉ. किरण भिंगार्डे, भूलतज्ञ

डॉ. किरण भिंगार्डे म्हणाले, ‘‘मी ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिले, अशा प्रशिक्षण घेतलेल्यांनी २६ जणांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने योग्य वेळी करणे आवश्यक आहे.’’

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावे आणि गल्ल्या यांमध्ये डौलाने फडकला भगवा ध्वज !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

जिल्ह्यात विविध ठिकाणी चालू असलेल्या दौडीच्या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र, धर्म, तसेच विविध विषयांवर प्रबोधन केले.

७ व्या दिवशी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची शाकंभरी रूपात पूजा !

शारदीय नवरात्रीच्या ७ व्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा करण्यात आली होती. बदामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता आहे.

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.

काळानुसार साधना केल्यास वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात आनंदी रहाणे सहज शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो.

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने आणि प्रतिकात्मक पुतळा दहन

हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निदर्शने करून पी.एफ्.आय.चा पुतळा जाळण्यात आला. याचसमवेत पाकिस्तानचाही झेंडा जाळण्यात आला. आंदोलनानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ‘शारदीय महोत्सव २०२२’ची जय्यत सिद्धता !

मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.

जिहादी प्रवृत्तीच्या दबावापुढे झुकून तेलंगाणातील सरकारकडून आमदार टी. राजासिंह यांना अटक ! – अधिवक्ता सुधीर वंदूरकर-जोशी, जिल्हामंत्री, विहिंप

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन ! 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

घटस्थापनेला हिंदु जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीने हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्प अभियानास आरंभ !