७ व्या दिवशी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची शाकंभरी रूपात पूजा !

कोल्हापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – शारदीय नवरात्रीच्या ७ व्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा करण्यात आली होती. बदामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता आहे. ज्या वेळेला अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला, तेव्हा ऋषिमुनी आणि देव यांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्या वेळेस जगदंबेने प्रकट होऊन स्वतःच्या शरिरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले; म्हणून तिला ‘शाकंभरी’ असे नाव मिळाले. शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये रहाणारी देवी असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी पौष मासात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र केले जाते. शाकंभरी सिंहावर विराजमान होऊन ८ हातांमध्ये विविध आयुधे धारण करते.