पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ‘शारदीय महोत्सव २०२२’ची जय्यत सिद्धता !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अपंगांना दर्शनासाठी विशेष उपलब्ध करून दिलेल्या आसंद्या

कोल्हापूर, २३ सप्टेंबर (वार्ता.) – २६ ऑक्टोबरपासून चालू होत असलेल्या ‘शारदीय महोत्सव २०२२’ची पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जय्यत सिद्धता चालू आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील कळसाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरातील कळसाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात
स्वच्छता, रंगरंगोटी केल्यानंतर मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे

मंदिराची स्वच्छता पूर्ण झाली असून शिखरांच्या रंगरंगोटींचे काम अंतिम टप्प्यात आहे. परिसरातील दुरुस्तीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. अपंगांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी विशेष आसंद्यांची सोय करण्यात आली आहे.