कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

केरले गावातील श्री दुर्गामाता दौडीच्या प्रसंगी प्रबोधनच्या वेळी उपस्थित धारकरी

कोल्हापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात विविध ठिकाणी चालू असलेल्या दौडीच्या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्र, धर्म, तसेच विविध विषयांवर प्रबोधन केले.

१. पेठवडगाव येथील दौडीत हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी विषय प्रस्तुत केला. याप्रसंगी पुष्कळ धारकरी उपस्थित होते. गावातील एका राष्ट्रप्रेमीने ‘हलाल जिहाद’च्या ५० ग्रंथांचे वितरण केले.

२. मांगूर येथील दौडीत कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी ‘संस्कृतीरक्षण’ हा विषय मांडला. या प्रसंगी ५०० हून अधिक धारकरी उपस्थित होते.

३. शाहूवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. पूजा कुलकर्णी यांनी औक्षण करून दौडीचे स्वागत केले.

४. शिरोली येथे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या पुढाकाराने श्री दुर्गामाता दौडीच्या ध्वजाला श्री. प्रथमेश गावडे यांनी पुष्पहार अर्पण केला.

५. भादोले येथील श्री. प्रीतम पवार यांनी मांडलेल्या विषयाचा लाभ ४० धारकर्‍यांनी घेतला.

६. भेंडवडे येथे श्री. किरण दुसे यांनी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर प्रबोधन केले. त्या प्रसंगी ८० धारकरी उपस्थित होते, तर केरले येथे श्री. किरण दुसे यांनी याच विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ १०० धारकर्‍यांनी घेतला.