कोल्हापुरातील म्हशींचे दूध कट्टे बंद ठेवू नका !

कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लंपी चर्मरोगाचा वेगाने प्रसार होत असल्याने पशूधन मालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. या रोगाचा संसर्ग केवळ गायींमधून होत असल्याने कोल्हापूर शहरात म्हशींचे दूध कट्टे बंद करू नयेत..

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर ठप्प !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम जवळपास वर्षभर झाले ठप्प आहे. कुंडाच्या शेजारी असलेल्या एका इमारतीमधील एका दुकानदाराकडून सहमती आलेली नाही. त्यामुळे या इमारतीची हस्तांतर प्रक्रिया रखडली आहे.

कोल्हापूर महापालिकेने यंत्राद्वारे श्री गणेशमूर्तींचे केलेले विसर्जन हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य !

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, यंत्राद्वारे विसर्जन चालू असतांना तेथे उपस्थित असणारे काही कर्मचारी श्री गणेशमूर्ती ट्रकमधून खाणीत फेकून देत असतांनाचे व्हिडिओ समोर आले आहेत.

ज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

योग्य नियोजनकौशल्य आणि निर्णयक्षमता या गुणांच्या आधारे खर्‍या अर्थाने ‘नेतृत्व विकास’ साधता येतो. त्यामुळे प्रत्येकाने हे गुण स्वत:मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

शिवाजी विद्यापिठाच्या पेपरफुटी आणि परीक्षा निकालातील गोंधळाविषयी अभाविपचा कुलसचिवांना घेराव !

विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्यांची विद्यापीठ प्रशासन नोंद का घेत नाही ? विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागणे, हे विद्यापीठ प्रशासनासाठी लज्जास्पद आहे !

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतरच कोल्हापूर महापालिकेवर कारवाई !

पंचगंगा नदी प्रदूषित केल्याच्या प्रकरणी कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने २६ ऑगस्टला २ कोटी २० लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. ‘सुभाष स्टोअर्स’मधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळून पंचगंगा प्रदूषित होते…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी पन्हाळगड येथील ‘लंडन बस’ या नावाची पाटी हटवली !

भारत स्वतंत्र झाला, तरी वैचारिकदृष्ट्या आपण पारतंत्र्यातच आहोत, हे दर्शवणारी ही घटना आहे ! इंग्रजी नावाची पाटी आहे, हे लक्षात येऊन ते काढण्यासाठीचा पाठपुरावा करणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांत प्रवचन, सामूहिक नामजप या माध्यमांतून धर्मप्रसार !

अनेक मंडळांनी विषय आवडल्याचे सांगून बहुतांश सर्वच ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांना परत प्रबोधन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

महापालिकेने ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ करणारे यंत्र (रोलर मशीन) हटवल्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून प्रशासनाचे आभार !

कोल्हापूर महापालिकेने घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी इराणी खण येथे ‘यांत्रिक पद्धतीने विसर्जन’ (रोलर मशीन) करणारे यंत्र बसवले होते. यात यंत्रावर एका बाजूने मूर्ती ठेवण्यात येत होत्या.

पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हिंदु जनजागृती समिती सेवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा !

पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने समिती सेवकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .