कोल्हापूर – आपण ज्या हिंदु धर्मात जन्मलो, त्या धर्मात अमूल्य असे ज्ञान आहे. आपण सर्वजण मात्र धर्मशिक्षणाच्या अभावी सकाळी उठल्यापासून पाश्चात्त्यांच्या अंधानुकरण करण्यातच धन्यता मानतो. आज बहुतांश जणांकडे पैसा असूनही मन:शांती नाही, अशी स्थिती आहे. अशा स्थितीत हिंदूंनी काळानुसार कुलदेवतेची उपासना केल्यास वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि जीवनात आनंदी रहाणे सहज शक्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथील ‘आत्मदर्शन हॉल’ येथे जिज्ञासूंसाठी आयोजित केलेल्या सत्संगात त्या मार्गदर्शन करत होत्या. या मार्गदर्शनासाठी अनेक जिज्ञासू उपस्थित होते.
निपाणी (कर्नाटक) – सद्गुरु स्वाती खाडये यांनी निपाणी येथे जिज्ञासूंना साधनेविषयी मार्गदर्शन केले. महर्षि वाल्मीकि भवन येथे झालेल्या या मार्गदर्शनासाठी निपाणी शहरासह जत्राट, नांगनूर, कणगला, संकेश्वर, लिंगनूर या गावांतील १२० जिज्ञासू सहभागी झाले होते. मार्गदर्शन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले.
अभिप्राय – श्री. राजू इंडी, उद्योजक, निपाणी : आतापर्यंत पहिल्यांदाच अशा प्रकारचा विषय ऐकला. मिळालेले मार्गदर्शन अमूल्य होते.
विशेष१. निपाणी येथील मुख्याध्यापक डॉ. निंगप्पा मादन्नावार हे सहकुटुंब प्रवचनाला आले होते. त्यांची मातृभाषा कन्नड असूनही ते संपूर्ण प्रवचनाला उपस्थित होते. २. निपाणी येथील कस्तुरबा शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रल्हाद कमते यांनी मार्गदर्शन ऐकले. त्यानंतर त्यांनी साधकांना पुन्हा भ्रमणभाष करून श्राद्धविषयक माहिती जाणून घेतली. ३. आधुनिक वैद्या मोहिनी डावरे, निपाणी या काही वेळासाठी कार्यक्रमासाठी आल्या होत्या; मात्र विषय ऐकत असतांना त्यांना कार्यक्रम सोडून जावेसे वाटले नाही. मार्गदर्शन ऐकतांना त्यांच्या मनातील विचारांची गती आणि गोंधळ अल्प झाला, तसेच स्थिर वाटल्याचे जाणवले. |