
चंदगड (जिल्हा कोल्हापूर), ३० सप्टेंबर (वार्ता.) – तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३० सप्टेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनासाठी १०० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. आंदोलनात सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद धनवडे यांनी केले, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील आणि श्री. भैरवनाथ पाटील उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले.
विशेष
१. चंदगडसारख्या दुर्गम भागात झालेले पहिलेच आंदोलन होते आणि त्यासाठी १३ गावांमधून धर्मप्रेमी आले होते. आंदोलन यशस्वी होण्यासाठी श्रीराम सेनेचे श्री. महंदेश देसाई, श्री. तुकाराम मरगाळे, धर्मप्रेमी सर्वश्री शाहू दळवी, सचिन पाटील, विकास चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
२. आंदोलनस्थळी धर्मप्रेमींनी दिलेल्या जोरदार घोषणांनी आंदोलन लक्षवेधी झाले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !