आधुनिक रझाकार !

तेलंगाणातील हिंदूंना स्वाभिमानाने जगायचे असल्यास त्यांना आधुनिक रझाकारांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देण्यासाठी उभे रहावेच लागेल. यासाठी तेथील हिंदू सिद्ध आहेत का ? बोधन प्रकरणातून तेलंगाणामधील सत्ताधारी पक्ष, प्रशासन आणि पोलीस हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून येणार नाहीत, हे सिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन परिणामकारक संघटन, हाच हिंदूंच्या प्रत्येक समस्येवरील उपाय आहे, हे जाणा !

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता ! – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भारताची राज्यघटना नव्याने लिहिण्याची आवश्यकता आहे. देशातील सर्व नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असून त्यांना ‘माझ्या समवेत लढणार का ?’, असे विचारणार आहे.

तेलंगाणा राज्यातील प्रत्येक दलित कुटुंबातील एका सदस्याला शासन देणार १० लाख रुपये !

लोकशाहीमध्ये अशा प्रकारे करदात्यांचे पैसे केवळ जातीच्या आधारे वाटण्याचा सरकारला काय अधिकार ? जर या जातीमध्ये कुणी आर्थिक सधन असतील, तर त्यांनाही पैसे देणार का ?

‘दलितांना सन्मान द्यायला अल्प ठरल्याने ते धर्मांतर करून ख्रिस्ती होतात !’ – तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

दलितांना सन्मान न दिल्याने ते ख्रिस्ती होत नसून खिस्ती मिशनरी त्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करतात आणि नंतर वार्‍यावर सोडतात, ही वस्तूस्थिती आहे.

प्रसिद्धीमाध्यमे कोरोनाविषयीची चुकीची माहिती पसरवत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण !

जर प्रसिद्धीमाध्यमे चुकीची माहिती पसरवत असतील, तर तेलंगाणा सरकार कारवाई का करत नाही ? कि राव केवळ निराधार आरोप करत आहेत ?

तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आंदोलन करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’ म्हटले !

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना एका सभेच्या वेळी आंदोलन करून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांना ‘कुत्रे’  संबोधले. विरोधी पक्षांनी या प्रकरणी ‘चंद्रशेखर राव यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

…अन्यथा दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन ! – तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांची चेतावणी

जनता आपत्काळात दिलेल्या सूचना गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे अशी चेतावणी द्यावी लागते, हे जनतेला लज्जास्पद ! या संकटावर मात करण्यासाठी शासकीय आदेशांचे पालन करणे अपरिहार्य आहे.