पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता

डावीकडून तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

भाग्यनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ ऑगस्ट २०२२ या दिवशी नवी देहली येथे आयोजित केलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या राष्ट्रीय समितीच्या बैठकीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनुपस्थित रहाण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या समितीचे सदस्य आहेत. पंतप्रधानांकडून या बैठकीचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना मिळाले आहे, अशी माहिती तेलंगाणा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ५ फेब्रुवारी २०२२ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलेले नाहीत. त्यामुळे ते या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता अल्पच आहे, असे तेलंगाणा राष्ट्रीय समितीच्या सूत्रांनी सांगितले.