‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे नाव आता ‘भारत राष्ट्र समिती’ !  

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातील सत्ताधारी पक्ष ‘तेलंगाणा राष्ट्र समिती’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसर्‍याच्या मुहूर्तावर पक्षाने नाव पालटून ‘भारत राष्ट्र समिती’ असे केले आहे.

आता राज्यात पक्षाने केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती संपूर्ण देशभरात सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.