Isro’s ‘Spedex’ Mission : ७ जानेवारीला अंतराळात २ यान एकमेकांना जोडले जाणार !

  • इस्रोची ‘स्पेडेक्स’ मोहीम प्रक्षेपित !

  • मोहिमेत यश मिळाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – येथील उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून ३० डिसेंबरच्या रात्री भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (‘इस्रो’ने) ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम’ प्रक्षेपित केली. यात ‘सी.एस्.एल्.व्ही.-सी ६०’ रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० कि.मी. वर अंतराळात २ यान जोडले जाणार आहेत.

७ जानेवारी २०२५ या दिवशी हे २ यान जोडले जातील.

मोहीम यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. या मोहिमेच्या यशावर भारताची ‘चंद्रयान-४’ मोहीम अवलंबून आहे. या मोहिमेमध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. ही मोहीम वर्ष २०२८ मध्ये प्रारंभ होऊ शकते.