|
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘इस्रो’ने भारताने अंतराळात २ यानांना एकत्र जोडण्याचा (‘डॉकिंग’चा) विक्रम केला आहे. १६ जानेवारीला ही घटना घडली. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर यानांना अंतराळात जोडणारा भारत चौथा देश ठरला आहे. ‘चंद्रयान-४’, ‘गगनयान’ आणि ‘भारतीय अंतराळ स्थानक’ यांसारख्या मोहिमा या मोहिमेच्या यशावर अवलंबून होत्या. ‘चंद्रयान-४’ मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत, तर ‘गगनयान मोहिमे’त भारतियांना अंतराळात पाठवले जाणार आहे.
🚀 🇮🇳 India makes history!
ISRO successfully docks SpaDeX satellites in space, becoming the 4th country to achieve this feat.🌟
Two 220-kg satellites were brought within 3 meters of each other, their rings joined, retracted, and locked in space 🛰️
ISRO also demonstrated… pic.twitter.com/0rAktdu6tN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 16, 2025
१. इस्रोने ३० डिसेंबर २०२४ च्या रात्री १० वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अंतराळ ‘डॉकिंग’ प्रयोग मोहीम प्रक्षेपित केली होती. या अंतर्गत ‘पीएस्एल्व्ही-सी ६० रॉकेट’च्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० कि.मी.वर २ अंतराळयान तैनात करण्यात आले.
२. ७ जानेवारीला हे अंतराळ यान जोडले जाणार होते; परंतु ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर ८ जानेवारीला डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र अंतराळयान ३ मीटरच्या जवळ आणल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे ‘डॉकिंग’ होऊ शकले नाही. अखेर १६ जानेवारीला ही मोहीम यशस्वी झाली.
३. या २ अंतराळयानांमध्ये थेट संपर्क नव्हता. त्यांना भूमीवरून मार्गदर्शन करण्यात आले. दोन्ही अंतराळयान एकमेकांच्या जवळ आणले गेले. आता येत्या काही दिवसांत २ अंतराळयानांमधील विद्युत् ऊर्जा हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक केले जाईल. त्यानंतर ही याने एकमेकांपासून स्वतंत्र होतील आणि ते दोघेही पुढचे कार्य चालू करतील. ही याने अनुमाने े २ वर्षे मौल्यवान माहिती पाठवणार आहेत.
४. भारताने या ‘डॉकिंग’ यंत्रणेचे ‘पेटंट’ (स्वामित्व) घेतले असून या ‘डॉकिंग’ यंत्रणेला ‘इंडियन डॉकिंग सिस्टम’, असे नाव देण्यात आले आहे. कोणतीही अंतराळ संस्था या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे तपशील उघड करत नसल्याने भारताला स्वतःची ‘डॉकिंग’ यंत्रणा विकसित करावी लागली. १६ मार्च १९६६ या दिवशी अमेरिकेने पहिल्यांदा यानांचे ‘डॉकिंग’ केले होते.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !