आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय.

भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची पाकला भीती

देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्यासाठी भारत पुन्हा एकदा पाकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो, अशी भीती पाकमध्ये निर्माण झाली आहे.

ब्रिटनमध्ये दोघांवर अ‍ॅलर्जीमुळे कोरोना लसीचा दुष्परिणाम

ब्रिटनमध्ये फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली कोरोनावरील लस देण्याला प्रारंभ झाला असतांना या लसीमुळे दोघांची प्रकृती बिघडली आहे. हे दोघेही जण  आरोग्य कर्मचारी आहेत.

तुर्कस्तानकडून सीरियातील १०० आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण !

भारताने तुर्कस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कारच घातला पाहिजे आणि काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकवर सैनिकी कारवाई केली पाहिजे !

चीनने नियंत्रणरेषेवर उभारल्या २० हून अधिक चौक्या !

यामागे चीनचा उद्देश येथील गस्त अधिक चांगली करून भारतावर लक्ष ठेवण्याचा आणि भारताला तत्परतेने प्रत्युत्तर देण्याचा असल्याचे म्हटले जात आहे.

इंडोनेशियामध्ये कोरोनावरील चिनी लसीला हलाल प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता

आता कोरोना लसीलाही हलाल प्रमाणपत्र म्हणजे कट्टरतेचा अतिरेकच होय ! याविरोधात तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ? हिंदूंनी त्यांच्या धर्मशास्त्रानुसार लसीची मागणी केली असती, तर हेच पुरो(अधो)गामी त्यांच्यावर तुटून पडले असते !

पाकमध्ये हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचा चिनी तरुणांसमवेत विवाह लावून त्यांना दासी बनवले जाते ! – अमेरिकेचा आरोप

पाक आणि चीन यांची ही युती चांगले काम कधीतरी करू शकेल का ? जगानेच आता या दोन्ही देशांच्या विरोधात बहिष्काराचे शस्त्र उगारणे आवश्यक आहे !

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !

मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्यांचे बंगालच्या खाडीतील बेटावर स्थलांतर !

भारतातील घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी यांनाही भारताने या बेटावर पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास त्यात चुकीचे काय ?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी !

पृथ्वीवरील भूमीमध्ये भाजीचे उत्पादन घेण्यात येते, तसे आता अवकाशातही भाज्यांचे उत्पादन घेण्यास चालू झाले, तर आश्‍चर्य वाटणार नाही, अशी घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली आहे.