अफगाणिस्तानमध्ये मशिदीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी ठार

  • मशिदींमध्ये बॉम्ब बनवण्यात येतात, याविषयी मुल्ला मौलवी फतवा काढतांना कधी दिसत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • भारत धर्मनिरपेक्ष देश असून येथे मुसलमान अल्पसंख्य आहेत; मात्र अफगाणिस्तान इस्लामी देश असून तेथे मुसलमान बहुसंख्य आहेत. तेथे अशा प्रकारच्या घटना घडतात आणि जगातील एकही इस्लामी संघटना किंवा अन्य इस्लामी देश याविरोधात तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

काबूल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानच्या दौलताबादमधील कुलतक गावामधील एका मशिदीमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात असतांना झालेल्या स्फोटात ३० तालिबानी तरुणांचा मृत्यू झाला. अफगाण नॅशनल आर्मीने या घटनेची माहिती दिली.

ठार झालेल्यांपैकी ६ जण विदेशी होते. ‘हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, ठार झालेल्यांच्या मृतदेहांच्या चिंधड्या उडाल्याने त्यांची ओळखही पटवता येत नाही’, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दुसर्‍या एका घटनेत कुंदुज प्रांतामध्ये तालिबान्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २ मुलांचा मृत्यू झाला.