उघूर नंतर आता उत्सुल मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न

मशिदींवर ध्वनीक्षेपक लावण्यासह नवीन मशिदी बांधण्यावर बंदी

चीनने त्याच्या देशातील मुसलमानांवर कितीही नियंत्रण ठेवले, अत्याचार केले, तरी जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडणार नाही; मात्र भारतात मुसलमानंवरील खोट्या आक्रमणाच्या नावावरूनही हे देश थयथयाट करतील !

आता चीन उत्सल मुस्लिमांचा नाश करण्याचा, मशिदींमध्ये लाऊडस्पीकर बंदी, अरबी बंदीचा प्रयत्न करीत आहे

सान्या (चीन) – उघूर मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने आता त्याच्या देशातील उत्सुल मुसलमानांकडे मोर्चा वळवला आहे.

त्यांच्या मशिदींवर ध्वनीक्षेपक लावण्यास, नवीन मशिदी बांधण्यास आणि अरबी भाषा शिकण्यास बंदी घालण्यात आली आहे. सान्या शहरामध्ये १० सहस्र उत्सुल मुसलमान रहातात. याविषयीचे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.