सोलापूर येथे मुलाने डोक्यात गॅस सिलेंडर फेकून मारल्याने आईचा मृत्यू

सोलापूर – येथे घरगुती वादातून मद्याच्या नशेत मुलाने आईच्या डोक्यात गॅस सिलेंडर फेकून मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. शरणव्वा गोळसर (वय ६५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धराम गोळसर (वय ३२ वर्षे) या मुलाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (नशेमध्ये आपण काय करत आहोत याचे भान न राहिल्याने मनुष्य किती टोकाचे पाऊल उचलतो. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्यासाठी साधना आणि धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे, हेच या उदाहरणावरुन स्पष्ट होते ! – संपादक)  घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी आले. त्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित होता. त्या वेळी नशेमध्ये तो पोलिसांनाही उलट उत्तरे देत होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह कह्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.