सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पत्रकार परिवर्तनाचे काम करत आहेत, तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे आयोजित पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना केले.

पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशींचा भारतात अवैधरित्या निवास, शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात समितीची स्थापना

अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्‍या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !

चिपी विमानतळाला भंगसाळ नदीचे पाणी देण्यास कुडाळ शहर सुधार समितीचा विरोध

भविष्यात कुडाळ शहर, तसेच येथील एम्.आय.डी.सी.मध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समितीचे सदस्य आणि शहरातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने दिले.

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’

माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद

अपहरण करून मारहाण करत ५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध !

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे.