सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – सातारारोड-पाडळी येथील माजी सरपंच स्वाती जगदाळे यांचे पती भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भगतराम जगदाळे हे राजस्थान येथे कर्तव्यावर होते. एक दिवसापूर्वीच ते १ मासाच्या सुट्टीवर आले होते. आत्महत्येचे वृत्त समजताच परिसरातील बाजारपेठ बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.