माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद

गिरीश महाजन

पुणे – जळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक विजय पाटील (वय ५२ वर्षे) यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत ५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जानेवारी २०१७ ते २०२१ या कालावधीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी अधिवक्ता विजय पाटील यांनी तक्रार दिली आहे. ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या संचालक पदाचे काम पहातात. पुण्यामध्ये संस्थेचे कागदपत्र देण्यासाठी आरोपींनी अधिवक्ता पाटील यांना बोलावून घेतले. पुण्यात आल्यावर त्यांचे अपहरण करून पुण्यातील सदाशिव पेठेतील एका सदनिकेत त्यांना डांबून ठेवले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव आणला, तसेच जळगावला जाऊन संस्थेची तोडफोडही केली. याप्रकरणी अधिक अन्वेषण चालू आहे.