कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध !


कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ५ जानेवारी या दिवशी ७ सहस्र ४० उमेदवारांनी आवेदन माघारी घेतले. यामुळे जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात शाहूवाडी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. १४७ प्रभागातील ३६८ सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे. या दिवशी गावातील सर्व दुकाने, आस्थापने, निवासी उपाहारगृह, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम यांना पगारी सुटी द्यावी, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी दिल्या आहेत.