सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण !

डॉ. भागवत यांना ९ एप्रिल या दिवशी सर्दी आणि खोकला यांचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांची लगेच चाचणी करून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.

… मग राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन कोरोनावरील लस कशी दिली जाते ? – मुंबई उच्च न्यायालय

‘देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस घेतली, मग महाराष्ट्रातील राजकीय नेते काही वेगळे नाहीत की, त्यांना घरी जाऊन लस देण्याची आवश्यकता भासावी.’

शासनाचे ‘जम्बो कोविड सेंटर्स’ खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोविड सेंटर्स’ मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टर आल्यास उपचारासाठी साहाय्य होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. यामध्ये तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपूर येथे कोविड रुग्णालयातील भीषण आगीत ४ रुग्णांचा मृत्यू

यापूर्वी कोविड रुग्णालयांना लागलेल्या आगीतून प्रशासनाने ना कोणता धडा घेतला, ना उपाययोजना काढल्या. त्यामुळेच परत परत अशी आग लागत आहे. उत्तरदायी असणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

ऑक्सिजनचा १०० टक्के पुरवठा वैद्यकीय क्षेत्राला देण्याचा राज्यशासनाचा आदेश !- राजेंद्र शिंगणे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा !

सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या !

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्‍या पडत आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागाची सेवा घेण्यासाठी रुग्णाने पूर्वानुमती घेणे आवश्यक

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले जाणार आहे.

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव कळवा !

आपणांसही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस त्वरित कळवा.