सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शहरातील किंग्जवे रुग्णालयात उपचार चालू करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे. डॉ. भागवत यांना ९ एप्रिल या दिवशी सर्दी आणि खोकला यांचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांची लगेच चाचणी करून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो’, असे ट्वीट केले आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे की, आदरणीय भागवत यांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.