पणजी – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तील बाह्यरुग्ण विभागाची सेवा घेण्यासाठी रुग्णाने दूरध्वनी करून पूर्वानुमती (अपॉइंटमेंट) घेण्याची प्रक्रिया पुन्हा चालू करण्यात येणार आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विभागांच्या प्रमुखांसमवेत झालेल्या एका बैठकीनंतर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घातलेले नियम आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे व्यवस्थापन यांवरही चर्चा करण्यात आली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे कठोरतेने पालन केले जाणार आहे. महाविद्यालयात रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.’’