कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रयोगशाळा यांसारख्या ठिकाणी आलेले कटू अनुभव कळवा !

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती

 

सध्या कोरोना महामारीच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही अधिक आहे. जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जात आहेत त्यांना अनेक कटू अनुभवही येत आहेत, उदा. तपासणीसाठी नमुने घेतांना ते योग्य प्रमाणात न घेतल्याने रुग्णांना पुन्हा नमुने देण्यासाठी धावपळ करावी लागणे, तपासणी अहवाल वेळेत न देणे, तपासणी अहवालाचा सविस्तर तपशील न देणे, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णाला उपचारांसाठी भरती करून घेण्यास नकार देणे; मात्र प्रतिष्ठित व्यक्तीने दूरभाष केल्यावर रुग्णाला भरती करून घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवणे, शासकीय रुग्णालयांत विनामूल्य मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नसणे, त्यामुळे बाहेरून सहस्रो रुपयांचे इंजेक्शन विकत आणायला लावणे, अहवाल प्राप्त नसल्याचे कारण सांगून मृतदेह नातेवाइकांच्या कह्यात न देणे इत्यादी.

आपणांसही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]