उपचार विनामूल्य असूनही ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील लाभार्थ्यांकडून काही रुग्णालयांनी १५ कोटी रुपये उकळले !

लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, याची माहिती मिळत नाही. पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर परवाना रहित करण्यासमवेत फौजदारी कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत !

शिकाऊ आधुनिक वैद्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला डोळा गमवावा लागला !

इंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे !

‘वाय.सी.एम्.’ रुग्णालयामध्ये शस्त्रकर्माअभावी रुग्णांचे हाल !

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती’ रुग्णालयामध्ये (वाय.सी.एम्.) ५ ते ६ मासांपासून शस्त्रकर्म विभागात आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना शस्त्रकर्मासाठी ३ ते ४ मास वाट पहावी लागत आहे.

ससून रुग्णालयातून दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश !

समाजातील नीतीमत्ता ढासळत चालल्याचे हे अजून एक उदाहरण ! अनेक वर्षांपासून बनावट प्रमाणपत्रे दिली जात असूनही ससून रुग्णालयावर कारवाई का केली नाही ? बनावट प्रमाणपत्रांमुळे अयोग्य व्यक्तींनी लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी !

संभाजीनगर येथे विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर नातेवाइकांची रुग्णालयात हाणामारी !

या वेळी सासर आणि माहेर यांच्या नातेवाइकांत हाणामारी झाली. या प्रसंगी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रतिकूल परिस्थितीत संयम राखून परिस्थिती स्वीकारण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे !

राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन !

परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित !

मुलाला कामावरून काढल्याच्या रागात वडिलांनी रुग्णालय फोडले !

खासगी रुग्णालयात ३-४ जणांच्या टोळीने रुग्णालयावर आक्रमण करत तोडफोड केली. यामध्ये रुग्णालयाची पुष्कळ हानी झाली आहे.

‘आय.एम्.ए.’ने रुग्णांची लूट थांबवावी !

खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता.

शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याविषयीची माजी गृहमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात अद्ययावत् सुविधांचा अभाव असल्याने खांद्यावरील शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याची अनुमती मिळावी, अशी सत्र न्यायालयाकडे मागणी केली होती.

वापराअभावी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयाची इमारत आणि साहित्य धूळखात पडून !

नाशिक रोड येथे महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाची ५ मजली इमारत बांधली आहे. त्यात सर्व रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारे साहित्यही आहे. आता मात्र हे साहित्यच नव्हे, तर संपूर्ण इमारतच धूळखात पडली आहे.