होळी-रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी मुंबई अन् पालघर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

रंगपंचमीच्या दिवशी असे अपप्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेणार्‍या सावरकरांप्रमाणे हिंदु राष्ट्राची शपथ घेणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यात ‘गाथा शौर्याची आणि सावरकरांच्या मनातील आदर्श हिंदु राष्ट्र’ या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात असे आवाहन करण्यात आले.

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

हे राष्ट्रच नाही, तर स्वर्ग आणि ग्रह यांठिकाणी जेथे धर्माचे पालन होत नसेल, तेथेही आपण धर्मपालन करण्यासाठी प्रयत्न कराल, असा विश्‍वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.  

हुतात्म्यांनी स्वतंत्र केलेल्या राष्ट्रात आपण हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

तुमच्या पिढीने आता वीर बनवून विजयाच्या पायरीवर म्हणजेच हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्वतंत्र हिंदुस्थानकडून हे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.

विशाळगडाच्या विषयाच्या संदर्भात लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू !

विशाळगड येथील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांची दुरवस्था, तसेच या संदर्भातील विविध समस्यांविषयी लक्ष घालून मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करू. यानंतर २ मासांच्या कालावधीत त्यावर काहीच हालचाल न झाल्यास पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करू,..

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीत ‘एंडोव्हमेंट’ कायदा लागू करून मद्रास प्रांतातील मंदिरांवर एकाधिकारशाही प्रस्थापित करण्यात आली. या अन्वये मंदिरांच्या १ लाख एकर भूमीचे अधिग्रहण केले गेले. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

राष्ट्राला भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांच्यासारखे समर्पित कार्य करणार्‍या युवकांची आवश्यकता आहे ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !

स्वरक्षणासाठी शक्ती, भक्ती आणि युक्ती या तिन्हींचा संगम हवा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

कित्येक महिलांवर प्रतिदिन अन्याय, अत्याचार होत आहेत. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ हवे. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही या वेळी केले.     

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथे ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाचे निमित्त !

होळीच्या वेळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श होलिकोत्सव साजरा करा !’ मोहीम