देहली, उत्तरप्रदेशमधील मथुरा, नोएडा आणि फरिदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

या वेळी देहली येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, मथुरा येथे समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, नोएडा येथे समितीचे श्री. श्रीराम लुकतुके अन् फरिदाबाद येथे समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

या सर्व महोत्सवांचा १ सहस्र ५५० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

२४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची २६ जुलैला राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली.

उद्धव ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्याकडून गरजूंना छत्र्यावाटप !

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी उपस्थितांना ‘जीवनातील साधनेचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.

प्रतापगडाप्रमाणे विशाळगडही अतिक्रमणमुक्त करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘मुक्त झाला प्रतापगड, वाट पहातोय विशाळगड’, ‘अब याचना नही, रण होगा, विशाळगड अतिक्रमणमुक्त होगा’, ‘ना हाजी का ना काझी का, हर गड है छत्रपती शिवाजी का’, असे फलक हातात धरून हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी २८ जुलै..

Renaming Ramnagaram District : ‘रामनगर’चे ‘बेंगळुरू दक्षिण’ करणार्‍या काँग्रेसचा श्रीरामविरोध स्‍पष्‍ट ! – हिंदु जनजागृती समिती

५०० वर्षांनंतर अयोध्‍येत प्रभु श्रीरामाचे भव्‍य मंदिर उभे राहिल्‍यानंतर देशभरात श्रीराममय वातावरण असतांना कर्नाटकात मात्र ‘रामनगर’ या जिल्‍ह्याचे नाव ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्‍याचा जो निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आहे, त्‍याचा हिंदु जनजागृती समितीने तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला आहे.

संपूर्ण जगाला तारणार्‍या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा

जेव्हा हिंदु धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागतो. त्यामुळे जग टिकून रहायचे असेल, तर हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. विनायक (श्याम) देशपांडे यांनी वर्धा येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

गुरूंनी सांगितलेले नाम, साधना, सेवा केली, तर आपली आणि समाजाची उन्नती होईल. अशा सात्त्विक समाजामुळे भारताला विश्वगुरु बनवणे शक्य होईल, असे मार्गदर्शन श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्ह्यात ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी !

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात खोपोली, जांभूळपाडा, पेण आणि अलीबाग अशा ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

भाग्‍यनगर येथून विशाळगडावर येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्‍यांची सखोल चौकशी करा ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

विशाळगड येथील अनधिकृत बांधकामाच्‍या संदर्भात हिंदुत्‍वनिष्‍ठांनी आंदोलन केल्‍यावर अनेक ‘सेक्‍युलरवादी’ नेत्‍यांनी तेथील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून ते करणार्‍या मुसलमानांचा सहानुभूती व्‍यक्‍त केली आहे.