सातारा, ४ ऑगस्ट (वार्ता.) – लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी राज्यात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली.
हिंदु महासभेचे अधिवक्ता श्री. दत्तात्रय सणस म्हणाले, ‘‘मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी ‘लव्ह जिहाद’ म्हणून नोंदवल्या जाव्यात. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘अँटी रोमिया स्कॉड’सारखी (छेडछाडविरोधी पथक) पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.’’ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. योगेश कापले म्हणाले, ‘‘उरणची घटना सुन्न करणारी आणि हिंदु युवतींमध्ये भय निर्माण करणारी आहे.’’
या वेळी समितीच्या सौ. रूपा महाडिक, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. धनराज जगताप, विश्व हिंदु परिषदेचे माजी शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडकर, अधिवक्ता जनार्धन करपे, अधिवक्ता धनंजय चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. प्रकाश शहाणे, श्री. जितेंद्र धमाले, सौ. अस्मिता फडतरे, ‘श्री दुर्गामाता मंदिर पंचपाळी हौद’ येथील विश्वस्त श्री. हिमांशु निकम, श्री. विश्वास सावरकर, जकातवाडी येथील ग्रामस्थ श्री. नीलेश भोसले यांसह ५० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.